अमरावती : वर्षा लढ्ढांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.) : अमरावती महापालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून वर्षा लढ्ढा (भाप्रसे) यांनी आज पदभार स्वीकारला. माजी आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्याकडून त्यांनी अधिकृतरीत्या कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध
अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी वर्षा लढ्ढा रुजू शहरात सुरू असलेले सर्व विकास प्रकल्प अधिक गतिमान करण्याचे आश्वासन


अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.) : अमरावती महापालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून वर्षा लढ्ढा (भाप्रसे) यांनी आज पदभार स्वीकारला. माजी आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्याकडून त्यांनी अधिकृतरीत्या कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पदग्रहण सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला. आयुक्त वर्षा लढ्ढा या यापूर्वी पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी अमरावती शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचे आश्वासन दिले. महापालिकेचे सुरू असलेले सर्व विकास प्रकल्प अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच माजी आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी आपल्या मनोगतात अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. महापालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प नवीन आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर सौम्या शर्मा-चांडक यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाचा आढावा घेत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande