लातूर - ॲड. सपना चिखले यांचा किल्ला येथे सत्कार
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। उदगीर विधिज्ञ संघाच्या 2026–27 च्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी अॅड. सपना विजय चिखले यांची निवड झाल्याबद्दल उदागीर बाबा स्वयंसेवक मंडळाच्या वतीने किल्ला परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ॲड. चिखले यांना शाल, पुष्
सत्कार सोहळा


लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। उदगीर विधिज्ञ संघाच्या 2026–27 च्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी अॅड. सपना विजय चिखले यांची निवड झाल्याबद्दल उदागीर बाबा स्वयंसेवक मंडळाच्या वतीने किल्ला परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ॲड. चिखले यांना शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे विधिज्ञ संघात महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात त्या संघाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रम उदागीर बाबा मठ संस्थान, किल्ला येथे पार पडला. यावेळी मठाधीश जयेश गीर गुरु, सतीशगीर महाराज, सोनू महाराज, किरण महाराज यांच्यासह विजय चिखले, विशाल वारकरे, संतोष रावणकोळे, राजू स्वामी, श्रीधर सावळे, सौरभ पत्की, बालाजी पवार, अमोल भवाळ, गौरव बच्चेवार, महेश सोनटक्के, प्रकाश तानशेट्टे, संजयकुमार हलकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते. उपस्थित मान्यवरांनी ॲड. सपना चिखले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande