
लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)।
रामानंद संप्रदाय लातूर जिल्ह्यातर्फे देवणी येथे येत्या १० एप्रिल शुक्रवारी जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या पादुका दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रामानंद संप्रदायातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम देवणी येथील उदगीर निलंगा या राज्य रस्त्यावर बुलढाणा अर्बन बँकेच्या समोर उमेश पाटील यांच्या शेतावर भव्य मैदानात ठेवण्यात आला आहे.
दिनांक १० एप्रिल शुक्रवारी सकाळी दहा वाजता शहरातपादुकाचे आगमन झाल्यानंतर पादुकाची भव्य शोभायात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरून बोरोल चौक लासोना चौक ते मिनी मार्केट होत कार्यक्रम स्थळी वाजत गाजत आगमन
होणार आहे. यानंतर ज.न. म. भूषण नाणीजकर यांचे धर्मप्रवचन होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील काही निराधार महिलांना स्वयंरोजगाराच्या उद्देशाने रोजगाराचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
गुरुपूजन व आरती सोहळा होणार आहे तदनंतर माऊलीच्या पादुका दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे तर नंतर महाप्रसाद होईल यावेळी उपासक दीक्षा हा पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपासकांना नरेंद्र माऊली महाराज ऑनलाईन पद्धतीने दीक्षा देणार आहेत. शेवटी पादुकावर पुष्पवरष्टी करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या धार्मिक सत्संग कार्यक्रमाचा लाभघेण्याचे आवाहन संयोजक संप्रदाय समितीतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis