बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त १७४ पोलीस शिपाई पदांची भरती लवकरच पूर्ण होणार
बीड, 08 अप्रैल (हिं.स.) : बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या १७४ पोलीस शिपाई पदांच्या भरतीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मैदानी आणि लेखी अशा दोन्ही स्तरांवर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ही प्रक्
बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त १७४ पोलीस शिपाई पदांची भरती लवकरच पूर्ण होणार


बीड, 08 अप्रैल (हिं.स.) : बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या १७४ पोलीस शिपाई पदांच्या भरतीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मैदानी आणि लेखी अशा दोन्ही स्तरांवर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होऊन, पुढील काही दिवसांत उमेदवारांच्या हाती नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून राबविलेल्या या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून ८ हजारांहून अधिक तरुणांनी अर्ज केले, त्यापैकी ५ हजार तरुण शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले. त्यातील १९०० उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

मैदानी आणि लेखी अशा दोन्ही स्तरांवर ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. आता फक्त तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे. सध्या निवडसूचीतील उमेदवारांच्या शैक्षणिक दाखल्यांसह जात प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी आणि इतर आवश्यक तांत्रिक कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात आहे.

ही पडताळणी पूर्ण होताच पात्र उमेदवारांना पोलीस दलात सेवेची संधी मिळणार आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षादलासाठी आवश्यक भरती लवकरच होईल.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande