अकोला महापालिकेची शास्ती अभय योजनेस मुदतवाढ; 20 एप्रिलपर्यंत 100 टक्के दंड माफी
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : अकोला महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता धारकांना दिलासा देत शास्ती अभय योजनेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीवरील शास्ती (दंड) पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने यापूर्वी ही योजना 31
अकोला महापालिकेची शास्ती अभय योजनेस मुदतवाढ; 20 एप्रिलपर्यंत 100 टक्के दंड माफी


अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : अकोला महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता धारकांना दिलासा देत शास्ती अभय योजनेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीवरील शास्ती (दंड) पूर्णतः माफ करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने यापूर्वी ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत लागू केली होती. मात्र, नागरिकांच्या सोयीचा विचार करून आता या योजनेची मुदत वाढवून 20 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत थकित मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 100 टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या मालमत्ता धारकांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी तात्काळ थकबाकीचा भरणा करून या संधीचा फायदा घ्यावा.

ही योजना मर्यादित कालावधीसाठी लागू असल्याने संबंधितांनी अंतिम मुदतीपूर्वी कर भरणा करून दंडमाफीचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande