
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)। आपली नदी आपली जबाबदारी या अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त जनसंवाद अभियान च्या माध्यमातून जनकल्याणी कार्यक्रम तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती व लोकहितार्थ कार्य करण्याचा संकल्प घेऊन भाजपाचा कार्यकर्ता हा सातत्याने संस्काराने विचाराने कृतीने जनतेला समर्पित असल्यामुळे जगातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पक्ष असून मोरणा नदी लोकसहभाग आणि सामाजिक दायित्व या भावनेतून संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेने प्रत्येक कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने अकोला शहराला सुजलाम सुपलाम करण्याचा संकल्प लागती देण्याचं काम जनता जनार्दन यांनी आशीर्वाद देऊन 12 तारखेपर्यंत चालणाऱ्या अभियानाला सक्रिय समर्थन द्यावा अशी आव्हान विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी केली.
निमवाडी येथील गणेश घाट पासून आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर जीसीपी मशीन तसेच पाचशे कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना महानगरपालिकेतील सहकार्याने जलकुंभी मोरणा नदीसाठी सफाई अभियान आरंभ प्रसंगी ते बोलत होते
अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदी याला साबरमतीच्या धर्तीवर करण्याचा प्रकल्प राज्य शासनाकडे प्रस्तावित असून काँग्रेस उबाठासेने प्रस्ताव ना मंजूर केल्यामुळे पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकर केंद्र सरकारकडे डीपीआर पाठवण्यात येणार असून रोजगाराच्या संधी तसेच विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारचा असल्याचे प्रतिपादन करून जनतेचा सहभाग ही घेण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाची असून संजय भाऊ धोत्रे यांनी 2001 मध्ये पाण्याच्या पातळी कमी झाल्यावर रेन हार्वेस्टिंग योजना राबवून शहरातील इंजिनिअर विविध संघटना आणि नागरिकांच्या सहकार्याने पाण्याची समस्या व मात केली होती राहतात अकोला शहरातील आपली नदी आपली जबाबदारी या अभियानाअंतर्गत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते भाजपा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा अभियान सुरू झाला आहे यामध्ये सर्व सामाजिक संघटनेने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हा अभियान राबविण्यात येत असून या अभियानाला जनतेचा पाठिंबा हेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीचे यश असल्याचे प्रतिपादन महापौर शारदाताई खेडकर यांनी केले. या अभियानातआमदार णधीर सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, अध्यक्ष जयंतराव मसने, मनपा सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर
या कार्यक्रमाला श्री किशोर मांगटे पाटील,कृष्णा शर्मा,अमोल गोगे संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, पवन महल्ले सागर शेगोकार संदीप गावंडे, अमोल मोहोकार तुषार भिरड,सागर शेगोकार, अमोल गिते, गोपाल मुळे, रणजित खेडकर, सतीश ढगे,संतोष पांडे,राजेंद्र गिरी सौ वैशाली शेळके, आरती घोगलिया चंदा शर्मा ऍड. कल्पना गोटफोडे, मंजुषा शेळके, प्राची काकड, विद्या खंडारे, रंजना विंचनकर, बबलू जगताप, डॉ राजु देशपांडे, डॉ अभय जैन डॉ किशोर मालोकार शरद तूरकर, नितीन ताकवाले,संदीप शेगोकार, विनोद मनवानी,किशोर वऱोकार, अमोल मोहोकार, विशाल इंगळे, हर्षद भांबेरे, संतोष डोंगरे, गजानन सोनोने दिलीप भरणे, संजय झाडोकार, धनंजय धबाले, सुनील बाठे सिद्धार्थ उपरवट हर्ष चौधरी, राजेश खेडकर पंडित हेमंत शर्मा जमीर खान भूषण इंदोरीय हेमंत सटवाले तसेच आदी महानगर पदाधिकारी, मंडळा पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे