अकोला: भीषण अपघातात एक ठार , एक जखमी..
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)।अकोल्यातील तेल्हारा ते थार मार्गावर आज घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय.. तर एक जन गंभीर जखमी आहे. मोटारसायकल आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे
Photo


अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)।अकोल्यातील तेल्हारा ते थार मार्गावर आज घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय.. तर एक जन गंभीर जखमी आहे. मोटारसायकल आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अचानक घडला असून धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अपघातात जखमी झालेल्या महिलेला तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृत व्यक्तीचा मृतदेह पुढील तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला आणि चूक कुणाची होती याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेगमर्यादा, रस्त्यांची स्थिती आणि वाहतूक नियमांचे पालन या बाबींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande