अमरावतीत माजी मंत्र्याशी संबंधित कथित खुनाच्या कटामुळे राजकीय वातावरण तापले
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री बच्चू कडू यांच्याशी संबंधित कथित खुनाच्या कट प्रकरणामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. चांदूरबाजार पोलीस ठाण्यात बच्चू कडू, गोलू माहुरे आणि इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरण गंभ
आसेगाव पूर्णा भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी बच्चू कडू ऑडिओ क्लिप प्रकरण


अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री बच्चू कडू यांच्याशी संबंधित कथित खुनाच्या कट प्रकरणामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. चांदूरबाजार पोलीस ठाण्यात बच्चू कडू, गोलू माहुरे आणि इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरण गंभीर वळण घेत आहे.

माहिती नुसार, हे प्रकरण आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाशी संबंधित कथित खुनाच्या कटाशी निगडीत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्षही या प्रकरणाकडे लागले आहे. आमदार तायडे यांनी या प्रकरणात कठोर कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी केली असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, आसेगाव पूर्णा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक पोलिसांना निवेदन दिले गेले आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे प्रकरणाला अधिक गती मिळाली असून, त्या क्लिपच्या आधारे सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच या कटात सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पोलिसांची पुढील कारवाई काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande