
चंद्रपूर, 07 एप्रिल (हिं.स.)। नागभीड भुमी अभिलेख कार्यालयातून नागरिकांना नियमितपणे सेवा मिळत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भुमी अभिलेख विभागाच्या बहुतेक सेवा जसे की ई- मोजणी, ई फेरफार, नक्कल अर्ज, मोजणी 'क' प्रत याबाबतच्या सेवा ऑनलाईन पध्दतीने पुरविल्या जातात. तसेच इतर कार्यालयीन सेवा देखील कार्यालयातील कर्मचा-यांकडून नियमितपणे दिल्या जात आहे. तसेच 3 डिसेंबर 2025 पासून उप अधीक्षक, भूमि अभिलेख, नागभीड हे पद नियमित भरलेले असल्यामुळे नागरिकांना सुरळीत सेवा मिळत असल्याचे नागभीड येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक वंदना नाईक यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव