पुणे - घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर
पुणे, 07 एप्रिल, (हिं.स.)। व्यावसायिक गॅस सिलेंडर गरजे नुसार उपलब्ध होत नसल्याने एलपीजी गॅस ग्राहकांकडून वाढीव दराने घरगुती वापराचा गॅस सिलिंडरची खरेदी करून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्याचा नवीन फंडा काही लहान, मोठ्या हॉटेल व ढाबा व्यवसाया
gas


पुणे, 07 एप्रिल, (हिं.स.)। व्यावसायिक गॅस सिलेंडर गरजे नुसार उपलब्ध होत नसल्याने एलपीजी गॅस ग्राहकांकडून वाढीव दराने घरगुती वापराचा गॅस सिलिंडरची खरेदी करून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्याचा नवीन फंडा काही लहान, मोठ्या हॉटेल व ढाबा व्यवसायाकडून केला जात आहे. यामुळे बहुतेक हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अल्प प्रमाणात पुरवठा केला जात आहे. गरजेनुसार व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने काही लहान, मोठे हॉटेल, ढाबा व्यावसायिक, हातगाडीवर वडापाव, पावभाजी, अमृततुल्य व अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घरगुती ग्राहकांकडून तीन ते साडेतीन हजार रुपयांना गॅस सिलेंडर खरेदी करून तो व्यावसायिक कारणासाठी वापरण्याचा नवीन फंडा वापरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande