रत्नागिरी : गुहागरमध्ये गॅस सिलेंडरची चोरी
रत्नागिरी, 7 एप्रिल, (हिं. स.) : गुहागर तालुक्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. तालुक्यातील विविध भागांतील वेगवेगळ्या घरांतून सात गॅस सिलेंडर चोरीला गेले. गॅस सिलेंडरचा वाढता तुटवडा, पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील अस्थिर परिस्थिती
रत्नागिरी : गुहागरमध्ये गॅस सिलेंडरची चोरी


रत्नागिरी, 7 एप्रिल, (हिं. स.) : गुहागर तालुक्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. तालुक्यातील विविध भागांतील वेगवेगळ्या घरांतून सात गॅस सिलेंडर चोरीला गेले.

गॅस सिलेंडरचा वाढता तुटवडा, पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील अस्थिर परिस्थिती यामुळे सिलेंडरला काळ्या बाजारात मागणी वाढली असून, त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आहे. गुहागरमधील काही वस्त्या, गल्लीबोळ आणि निवासी भागांमध्ये रात्री चोरट्यांनी घराबाहेर, पडवीत किंवा स्वयंपाकघराच्या मागील बाजूस ठेवलेले गॅस सिलिंडर हेरून ते पळवले. ही चोरी पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनेक कुटुंबांना सकाळी उठल्यानंतर सिलेंडर जागेवर नसल्याचे पाहून धक्का बसला. काही घरांमध्ये तर रिकामा आणि भरलेला सिलेंडर यातील फरक न करता चोरट्यांनी हाताशी लागेल तो सिलेंडर उचलल्याचेही सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande