रायगड: खोपोली पोलीसांची बालविवाह व लैंगिक अत्याचाराविरुद्ध तत्पर कारवाई
रायगड, 07 एप्रिल (हिं.स.) : खोपोली पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीसांनी सांगितले की, दिनांक 31 मे 2024 ते
Child marriage with minor girl in Khopoli; Case registered against accused under POCSO


रायगड, 07 एप्रिल (हिं.स.) : खोपोली पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलीसांनी सांगितले की, दिनांक 31 मे 2024 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत मौजे खोपोली, ता. खालापूर येथील आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे जाणूनही तिच्या अज्ञानाचा फायदा घेत बालविवाह केला त्यानंतर आरोपीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे पीडित गर्भवती झाली आणि तिच्या मुलाचे लिंग पुरुष असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध खालील कायदेशीर तरतुदी लागू केल्या आहेत:

पोक्सो ऍक्ट, 2012 – कलम 4 व 6 (बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध).

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 – कलम 9 (बालविवाहास प्रतिबंध).

या घटनेमुळे परिसरात मोठा खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाआहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पोलीस प्रशासन नागरिकांना सचेत राहण्याचे आणि अशा प्रकरणांची माहिती तातडीने पोलीसांना देण्याचे आवाहन करत आहे. ही घटना दाखवते की कायद्याची अंमलबजावणी प्रभावी आहे, आणि बालविवाह व लैंगिक अत्याचाराविरुद्ध सखोल कारवाई सातत्याने केली जाते

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande