नाशिक - गॅसचा काळाबाजार; ४६ सिलेंडर जप्त
नाशिक, 07 एप्रिल, (हिं.स.)। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या टोळीवर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र. १ व भद्रकाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदा कृत्याचा पर्दाफाश केला. पुरवठा मंत्
नाशिक - गॅसचा काळाबाजार; ४६ सिलेंडर जप्त


नाशिक, 07 एप्रिल, (हिं.स.)। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या टोळीवर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र. १ व भद्रकाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदा कृत्याचा पर्दाफाश केला. पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा गॅसचा काळाबाजार समोर आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे

या कारवाईत संतोष पटेंकर (२८), अनिल घोडे (२९), आशिक अहमद (३६) आणि संविध संतोष (२८) यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्या ताब्यातून ३३ घरगुती गॅस सिलिंडर, १३ व्यावसायिक सिलेंडर, गॅस भरण्याची मशीन, दोन इलेक्ट्रिक वजन काटे, तसेच एक मालवाहू वाहन, असा एकूण ३ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस भरण्याचे काम सुरू होते. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत काही जण घरगुती गॅस सिलिंडरचा साठा वळवून त्यातून व्यावसायिक सिलेंडर भरून अधिक दराने विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी विशेष कारवाईचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघमारे, संदीप भांड नाझीम पठाण यांना गुप्त माहिती मिळाली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व कर्मचारी तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या यशस्वीपणे पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande