पुणे - भारत मालिकेअंतर्गत नोंदणीकृत वाहनांचा कर भरण्याचे आवाहन
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। भारत मालिकेअंतर्गत नोंदणीकृत वाहनांचा कर भरण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत (बीएच) मालिकेमध्ये वाहने नोंदणीकृत करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. या
पुणे - भारत मालिकेअंतर्गत नोंदणीकृत वाहनांचा कर भरण्याचे आवाहन


पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। भारत मालिकेअंतर्गत नोंदणीकृत वाहनांचा कर भरण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत (बीएच) मालिकेमध्ये वाहने नोंदणीकृत करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार नोंदणीकृत झालेल्या वाहनांचा कर हा दोन वर्षासाठी घेतला जातो.

वाहनाचा कर वैध असल्याच्या कालावधीचा शेवटचा दिवस पूर्ण झाल्याच्या ७ दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये एवढा दंड आकारण्यात येतो, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande