
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली. त्या मुंबईतील 'निर्मल भवन' येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या आढावा बैठकीत मंगळवारी(दि. ७)बोलत होत्या. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता अजयसिंग यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ येथील जलजीवन मिशनच्या सर्व योजनांची कामे गतीने पूर्ण करावीत. पालम व गंगाखेड तालुक्यातील टंचाई निवारणार्थ विशेष दुरूस्ती कामे प्राधान्याने करावीत. वस्सा, चारठाणा, पिंपळगाव, काजळी तांडा येथील कामेही पूर्ण करावती, असे ही त्यांनी निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis