
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.
बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या माध्यमातुन सोलापूर शहरातील 200 पेक्षा जास्त मंडळांची मिरवणुक आपल्या विविध देखाव्यांच्या माध्यमातुन निघते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने रविवार दि. 19/04/2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मिरवणूकीची सुरुवात आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्याचे आयोजित केलेले आहे. तरी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे, सचिव रॉकी बंगाली, उत्सवा अध्यक्ष नागेश इंगळे, स्वाभिमानी आर.जी. कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे, मिलिंद प्रक्षाळे, चंद्रकांत सोनवणे तसेच मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड