कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, १२ एप्रिलला सोहळा
कोल्हापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टीस करणार्या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्यावतीने वर्षभर वैद्यकीय उपक्रमांसह चर्चासत्र, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवले जातात. असोसिएश
कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पदाधिकारी


कोल्हापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टीस करणार्या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्यावतीने वर्षभर वैद्यकीय उपक्रमांसह चर्चासत्र, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवले जातात. असोसिएशनच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त फुलेवाडीतील हॉटेल राहूल डिलक्स मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये केडीजीपीए धन्वंतरी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक रणदिवे, कार्याध्यक्ष डॉ. संजय केटकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता फुलेवाडी मेन रोड वरीतील हॉटेल राहूल डिलक्समध्ये होणार्या कार्यक्रमासाठी खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात १५ डॉक्टरांना

केडीजीपीए धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये करवीर मधून डॉ. शिवाजी मगदूम, पन्हाळ्यातून डॉ. नितीन माने, शाहुवाडीतून डॉ. सुभाष पाटील, हातकणंगलेतून डॉ. राजेश कुंभार, शिरोळ मधून डॉ. सुहास कांबळे, गडहिंग्लज मधून डॉ. किरण खोराटे, चंदगड तालुक्यातून डॉ. सुभाष पाटील, आजरा तालुक्यातून डॉ. प्रविण निंबाळकर, भुदरगड तालुक्यातून डॉ. सचिन सुतार, राधानगरीतून डॉ. अमित काळेबेरे, गगनबावड्यातून डॉ. शरद पाटील, कागल मधून डॉ. रवींद्र मगदूम, निगवे खालसा मधून डॉ. बाबुराव पाटील, पुनाळ मधून डॉ. श्रीनिवास चोपडे आणि सांगरूळ मधून डॉ. प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. तर बालिंग्याचे ज्येष्ठ डॉ. वसंत पाटील यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. त्याशिवाय डॉ. राजकुमार पाटील, डॉ. बद्रुद्दीन मणेर आणि डॉ. प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे, अशी माहिती डॉ. अशोक रणदिवे यांनी दिली. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव डॉ. बद्रुद्दीन मणेर, खजानिस अनिल कांबळे, माजी अध्यक्ष डॉ. सरदार पाटील उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande