डोंबिवलीतील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर मनसेने विचारला जाब
डोंबिवली, 07 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग २७ गोग्रासवाडी विभागाच्यावतीने ''फ'' विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. गोग्रास वाडी, गोपाळ नगर, गल्ली क्रमांक २ येथील आधार सोसायटीमध्ये घडलेल्या
Photo1


डोंबिवली, 07 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग २७ गोग्रासवाडी विभागाच्यावतीने 'फ' विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. गोग्रास वाडी, गोपाळ नगर, गल्ली क्रमांक २ येथील आधार सोसायटीमध्ये घडलेल्या स्लॅब कोसळण्याच्या अत्यंत गंभीर घटनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष प्रतीक देशपांडे, मनसे उपशहर अध्यक्ष दीपक शिंदे, महिला सेना उपशहर अध्यक्षा ममता आपटे,विभागाध्यक्षा, शालाका कानडे,उपविभाग समीक्षा इब्राहिमपूरकर, तसेच महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 'फ' प्रभाग क्षेत्रातील तसेच प्रभाग क्रमांक २७ मधील सर्व इमारतींचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावे, धोकादायक व विनाऑडिट इमारतींची त्वरित नोंद घेऊन कारवाई करावी, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशा मागण्या समोर ठेवण्यात आल्या.प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande