
रायगड, 07 एप्रिल (हिं.स.)। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज ठेवण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ९ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे.
ही तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तसेच विमानतळ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. या सरावामध्ये विमान अपघात, आग, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती यांसारख्या विविध आपत्तीजन्य प्रसंगांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रसंगी विविध यंत्रणांमधील समन्वय, प्रतिसादाची गती आणि कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात येणार आहे.
या रंगीत तालमीमुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)