पिं.चिं. महापालिकेच्या वतीने सर्वसाधारण सभेत एका कलाकाराचा विशेष सत्कार केला जाणार - महापौर
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। अनेक ज्येष्ठ कलाकारांनी दीर्घ काळ योगदान देऊन पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. अशा कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक सर्वसाधारण सभेत एका कलाकाराचा विशेष सत्कार केला
Ravi


पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। अनेक ज्येष्ठ कलाकारांनी दीर्घ काळ योगदान देऊन पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. अशा कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक सर्वसाधारण सभेत एका कलाकाराचा विशेष सत्कार केला जाणार आहे,’ अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, राजेश आगळे, किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक या वेळी उपस्थित होते.

‘शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेणे ही महापालिकेची सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे. या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. शहरातील सांस्कृतिक चळवळींना अधिक बळ मिळेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असून, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रालाही तितकेच प्रोत्साहन दिले जाते,’ असे लांडगे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande