
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। णे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बेकायदा आणि धोकादायक होर्डिंगचे फुटलेले पेव आता मोडीत काढले जाणार आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यासंदर्भात अतिक्रमण निर्मूलन विभागाला कठोर कारवाईचे आदेश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या होर्डिंगधारकांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, अनधिकृत होर्डिंगधारकांना रीतसर परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील मुळशी, मावळ, हवेली, खेड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा होर्डिंग उभारण्यात आले आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, उपायुक्त आशा होळकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु