पुणे - प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामां
पुणे - प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी


पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत.

इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. पुणे जिल्ह्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,४८१, रास्ता पेठ, पुणे दूरध्वनी : ०२०-२६१३३६०६ येथे संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande