
रत्नागिरी, 7 एप्रिल, (हिं. स.) : लोवले (ता. संगमेश्वर) येथे येत्या १४ एप्रिल रोजी सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संगमेश्वर विभागाचे सकल हिंदू संमेलन मंगळवारी, १४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेतीन वाजता लोवले येथील मयूरबागेत सुभाष पांचाळ यांच्या शुभगंधा मंगल कार्यालयात होणार आहे. हिंदू समाजाने सर्व प्रकारचे भेदभाव विसरून हिंदू म्हणून संघटितपणे अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीच हिंदू धर्म परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशाल सकल हिंदू संमेलन आयोजित केले आहे.
सर्वांनी पारंपारिक मंगल पोशाखात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक धर्माजी रामा जाधव, सहसंयोजक विनय विश्वनाथ मुरकर, कोषाध्यक्ष चारुदत्त प्रभाकर भिडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी