सोलापूर - श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी लक्ष्मीकांत बिराजदार यांची निवड
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)।श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव सोहळा २०२६ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठांन च्या वतीने सालाबाद प्रमाणे बसव जन्मोत्सव अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली .अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत बिराजदार यांची निवड करण्यात आली तस
sdfgsdf


सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)।श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव सोहळा २०२६ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठांन च्या वतीने सालाबाद प्रमाणे बसव जन्मोत्सव अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली .अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत बिराजदार यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष म्हणून अनिल वजीरकर यांची निवड करण्यात आली .नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा सत्कार पोलीस माजी उपायुक्त आर्वे साहेब, डॉ प्रकाश घटुळे , ज्येष्ठ विधीज्ञ ॲड बसवराज सलगर , नगरसेवक रुद्रेश बोरामणी , सुदीप दादा चाकोते , एम के पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . बसव सप्ताह आयोजित करून श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात यशस्वी करण्याचे संपन्न झालेल्या बैठकीत ठरले . जन्मोत्सवानिमित्त येणाऱ्या सप्ताह निमित्तप्रथम दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता वृक्षारोपणाच्या शुभारंभाने सप्ताहाची सुरुवात होणार आहे .या कार्यक्रमाचे स्थळ सिद्धेश्वर मंदिर परिसर गणपती घाट असे आहे यावेळी पोलीस माजी उपायुक्त आर्वे साहेब , डॉ प्रकाश घटुळे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड बसवराज सलगर , नगरसेवक रुद्रेश बोरामणी , सुदीप दादा चाकोते , एम के पाटील , शशी थोरात , बाबासाहेब देशमुख प्रतिष्ठानचे, अध्यक्ष राजशेखर विजापुरे , आप्पासाहेब मनगुळी विजयकुमार स्वामी, आदी वीरशैव समाज बांधव संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी केले. व आभार गिरीश मंद्रूपकर यांनी मानले मान्यवरांचे स्वागत मनोज कोले व राचप्पा आरळीमार यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande