
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)।दौंडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची यात्रा यंदा साधेपणाने साजरी होणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा यात्रेतील मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे व ज्येष्ठ नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी आज याबाबत माहिती दिली.
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची यात्रा आगामी ११ व १२ एप्रिल रोजी आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता मंदिरात श्री शेखर व्यास यांचे श्री काळभैरवनाथ यांच्या जन्माचे नारदीय कीर्तन होणार आहे. मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी देवजन्माचा सोहळा होणार आहे. शनिवारी (ता. ११) रात्री परंपरेप्रमाणे छबिना व पालखी मिरवणूक होणार आहे.यात्रा समितीने एका बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा यात्रेतील तमाशा, शोभेचे दारूकाम, निकाली कुस्त्या, संगीत बारी आदी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु