'नांदेड एज्युकेशन'च्या अध्यक्षपदी सीए डॉ. प्रविण पाटील
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)।हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्रता सैनानी प.पु.स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सीए डॉ. प्रविण पाटील तर उपाध्यक्षपदी ऍड. प्रफुल्ल अग्रवाल यांची सर्वामताने निवड करण्य
'नांदेड एज्युकेशन'च्या अध्यक्षपदी सीए डॉ. प्रविण पाटील


नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)।हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्रता सैनानी प.पु.स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सीए डॉ. प्रविण पाटील तर उपाध्यक्षपदी ऍड. प्रफुल्ल अग्रवाल यांची सर्वामताने निवड करण्यात आली. तर सचिव प्रा. श्यामल पत्की कुरुंदकर, सहसचिवपदी ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीए डॉ. प्रविण पाटील हे मागील पंचाहत्तर वर्षातील या संस्थेचे चौथे अध्यक्ष झाले आहेत.

प्रकृतीच्या कारणास्तव माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी कार्यकारिणीने सर्व मताने प्रभारी अध्यक्ष सीए डॉ. प्रविण सदाशिवराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी ऍड. प्रफुल्ल राधाकृष्ण अग्रवाल यांची संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. याच बैठकीत संस्थेच्या घटनेनुसार अध्यक्ष प्रविण पाटील यांनी सचिवपदी प्रा. शामल दीपनाथ पत्की (कुरुंदकर) यांची तर सहसचिवपदी ऍड.कॉ. प्रदीप अनंतराव नागापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, डॉ. काब्दे यांनी अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून संस्थेची यशस्वी धुरा सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात संस्थेची

सीए डॉ. प्रविण पाटील यांचे शिक्षण पीपल्स महाविद्यालयात झालेले आहे. संस्थेचा विद्यार्थी ते कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष आणि आता अध्यक्ष असा प्रवास त्यांनी केला. विशेष म्हणजे, संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थेच्या एका विद्यार्थ्याला अध्यक्षपदाचा प्रथमच बहुमान मिळाला आहे.

शैक्षणिक प्रगती लक्षणीय झाली. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता डॉ. प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande