अंबाजोगाईत न.प.कडून मोकाट श्वानांची धरपकड, मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा
बीड, 08 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर मोकाट श्वान व जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. वाहनचालक, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगरपालिक
अंबाजोगाईत न.प.कडून मोकाट श्वानांची धरपकड, मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा


बीड, 08 एप्रिल (हिं.स.)।

अंबाजोगाई शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर मोकाट श्वान व जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. वाहनचालक, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने परिस्थितीची गंभीर दखल घेत श्वान पथकाच्या माध्यमातून मोकाट श्वानांच्या धरपकडीची मोहीम हाती घेतली, यामुळे सध्या तरी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील गुरुवार पेठ, मंडई बाजार, मुकुंदराज स्वामी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रशांत नगर, श्री योगेश्वरी मंदिर तसेच खासगी शिकवणी वर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या भागांत दुचाकी, चारचाकी वाहने आणि रस्त्यावर उभे असलेले हातगाडे यामुळे वाहतूक आधीच विस्कळीत होते. त्यातच मोकाट श्वान व जनावरांची भर पडल्याने पादचाऱ्यांना रस्ता काढणे अधिकच कठीण बनले होते. विशेषतः श्वान समुहाने रस्त्यावर फिरताना दिसतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे

वातावरण होते. कधीही चावा घेण्याची शक्यता असल्याने नागरिक सतर्क राहून मार्गक्रमण करत होते. काही ठिकाणी जनावरे रस्त्यातच तासनतास ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.

या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आता प्रशासनाने श्वान पथक मोहीम राबवत मोकाट श्वानांना पकडून पिंजऱ्यात टाकण्याचे काम सुरू केले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande