नांदेड : आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)। महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त लोहा शहरात नगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे .नगराध्यक्ष शरद पाटील पवार उपनगराध्यक्ष करीम शेख व टीमने हा उपक्
नांदेड : आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम


नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)। महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त लोहा शहरात नगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे .नगराध्यक्ष शरद पाटील पवार उपनगराध्यक्ष करीम शेख व टीमने हा उपक्रम हाती घेतला असून शनिवार ११ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे .त्यानंतर महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे तेव्हा नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोहा नगरपालिकेत सत्तांतर झाले. आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शहरवासीयांना जे आश्वासन दिले त्याची पूर्तता करण्यासाठी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष शरद पवार उपनगराध्यक्ष करीम शेख हे प्रयत्नशील आहेत. महामानवाच्या जयंती निमित्ताने शहरात स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्या निमित्ताने सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते बुद्ध विहार जुना लोहा हा मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यात येणार आहेस्वच्छतेच्या माध्यमातून महान विचारांना अभिवादन करण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे

शिवजयंती नंतर भीमजयंती निमित्ताने शहर स्वच्छ केले जाणार आहे

लोहा शहरात संविधान जागर अंतर्गत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहा शहरात. ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान नगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता व्हावी याससाठी आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे तसेच सर्व नगरसेवक यांच्या हस्ते शहरातील नागरिकांना भारताचे संविधान व उद्घोषिका चे वाटप करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande