भोकर ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)। गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक प्रताप चव्हाण यांनी दिली आहे. वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या
भोकर ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम


नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)। गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक प्रताप चव्हाण यांनी दिली आहे.

वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड. जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शना नुसार व वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी एचपीव्ही लस बाबत माहिती, समज, गैरसमज, सामाजिक माध्यमावरील लसीची चुकीची माहिती बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ज्या मुलींचे वय १४-१५ वर्ष

पूर्ण झाले आहे त्या पालकांनी मुलींचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे व लसीकरण करून घ्यावे असे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande