
बीड, 08 एप्रिल (हिं.स.)।
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांनी भगवान गडाची गादी ही ऐश्वर्या संपन्न बनवली. ऐश्वर्या संपन्नतेची ती परंपरा आभारीत राखण्याचे काम आज गडाचे महंत न्यायाचार्य ह.भ.प.डॉ. नामदेव शास्त्री यांच्यामार्फत केले जात असल्याचे विधान धनंजय मुंडे यांनी केले.
श्रीक्षेत्र भगवानगडाच्यावतीने पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे आयोजित अखंड नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते. पुढे बोलताना आ. मुंडे म्हणाले, कोणी आपल्याला दोष देवो किंवा आपलं द्वेष करो, आपण मात्र कोणाला दोष द्यायचा नाही किंवा कुणाचा द्वेष करायचा नाही, नियती सर्वांचा हिशोब नीट करत असते, असे वक्तव्य माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे. भक्ती, शक्ती आणि विश्वासाची भगवानगडाची परंपरा आहे. लाखो ऊसतोड कामगार आपल्या एक रुपया कमाईतील वीस पैसे देणगी भगवानगडाला देतात आणि त्यातूनच या गडाची महती आज देश विदेशात पोहोचली आहे. भगवानगड हे आपले ऊर्जा स्थान असून भगवानगडाच्या सावलीत आपल्याला नेहमी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर महंत डॉ. नामदेव शास्त्री, गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.कृष्णा महाराज शास्त्री, आईसाहेब संस्थानच्या ह.भ.प. राधाताई सानप,
खा. निलेश लंके, आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. बाळासाहेब आजबे, अॅड. प्रताप ढाकणे, ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांसह आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis