
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)।महसूल विभागाच्या विभागीय स्तरावर झालेल्या सास्कृतिक कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयी संघाचे नेतृत्व मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी केले.
मराठवाडा महसूल विभागाच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विभागातील विविध जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्याऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक लोककला जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याच्या संघाने 'नृत्य-नाट्य गोंधळ' या लोकपरंपरेवर सादरीकरण केले.नांदेड संघाच्या सादरीकरणातताल, लय, वेशभूषा आणि पारंपरिकतेचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला. त्यामुळेच त्यांनी इतर जिल्ह्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. या संपूर्ण उपक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सूचना आणि प्रोत्साहनामुळे संघानेआत्मविश्वासाने उत्कृष्ट सादरीकरण केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis