नाट्यमहोत्सव : अकोट येथील ‘वारकरी’ नाटक प्रथम, तर बडनेऱ्याचे ‘सती’ द्वितीय
अमरावती, 08 अप्रैल (हिं.स.) : कामगार कल्याण मंडळ, अकोला विभागातर्फे आयोजित ७१ वी प्राथमिक नाट्यमहोत्सव स्पर्धा 23 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत संपन्न झाली. या स्पर्धेत 25 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र क
नाट्य महोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अकोट येथील ‘वारकरी’ नाटक प्रथम, तर बडनेऱ्याचे ‘सती’ द्वितीय


अमरावती, 08 अप्रैल (हिं.स.) : कामगार कल्याण मंडळ, अकोला विभागातर्फे आयोजित ७१ वी प्राथमिक नाट्यमहोत्सव स्पर्धा 23 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत संपन्न झाली. या स्पर्धेत 25 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन, छाबडा प्लॉट, अमरावती येथे आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी एम. टी. देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘मी ज्योतिबा फुले बोलतोय’ सादरकर्ते नाट्यकर्मी सुशीलदत्त बागडे, ‘सकाळ’चे धनंजय कानबाले, तसेच परीक्षक डॉ. प्रतिभा तेटू-नागपुरे, विश्वनाथ निळे, विराख जाकड, समीक्षक डॉ. प्रवीण राऊत, अकोला विभागाच्या सहायक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे, अमरावती गटाचे कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते.

स्पर्धेतील प्रमुख पारितोषिक खालीलप्रमाणे वितरित करण्यात आले:

प्रथम पुरस्कार: अकोट येथील कामगार कल्याण केंद्र – ‘वारकरी’

द्वितीय पुरस्कार: कामगार वसाहत, दाभा-बडनेरा संघ – ‘सती’

तृतीय पुरस्कार: कामगार कल्याण केंद्र, नवीवस्ती बडनेरा संघ – ‘दशानन’

याशिवाय, कामगार कल्याण केंद्र, बुलडाणा – ‘पंढरीचा ठाया मोडवीन’ आणि अमरावती येथील गांधी चौकातील कामगार कल्याण केंद्र – ‘औवासिस’ या नाटिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

विजेत्या सर्व संघांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमातून तरुण कलाकारांचे कौशल्य व सांस्कृतिक प्रतिभा सन्मानित करण्यावर भर दिला गेला.---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande