
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)।
राजीव गांधी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी संध्यादेविदास राठोड हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात यशस्वी प्रवेश करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत तिची पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, संध्याची निवड मुंबई पोलीसमध्ये चालक तसेच मुंबई कारागृहातही पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी झाली होती. मात्र, तिने मुंबई पोलीसमधील कॉन्स्टेबल पदाला प्राधान्य देत आपल्या सेवाभावाची दिशा निश्चित केली. संध्याने नागपूर येथे पोलीस कॉन्स्टेबलचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, ती आपल्या पदावर रुजू झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. ए. टी. शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. डी. एच. मेहत्रे, प्रा. डॉ. माधव बसवंते, प्रा. डॉ. राजू कोंडेकर, प्रा. डॉ. व्ही. सी. ठाकुर, प्रा. डॉ. मयूर दरबेसवार, प्रा. डॉ. सतीश उमाटे, प्रा. डॉ. मारुती देशमुख तसेच प्रा. सुलोचना माळवी उपस्थित होते. प्राचार्यांनी संध्याच्या मेहनतीचे कौतुक करत तिच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संध्या राठोडने महाविद्यालयाचे मार्गदर्शन आणि पाठबळ याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संध्याच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis