बीडमध्ये बौध्दीक संपदा कायदा' विषयावर सेमिनार
बीड, 08 एप्रिल (हिं.स.)।अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीन ऑनलाईन सेमिनार संपन्न झाले. सदरील सेमिनारचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. बौद्धिक संपदा अधिकार याचा इतिहास आण
बीडमध्ये बौध्दीक संपदा कायदा' विषयावर सेमिनार


बीड, 08 एप्रिल (हिं.स.)।अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीन ऑनलाईन सेमिनार संपन्न झाले. सदरील सेमिनारचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले.

बौद्धिक संपदा अधिकार याचा इतिहास आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली. तसेच पेटंट बद्दलची माहिती दिली. कॉपीराईटचे महत्व सांगून वाड्मयचौर्य टाळण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी प्रबंध लिहिताना कधीही दुसऱ्याचे साहित्य जसेच्या तसे वापरू नये. दुसऱ्यांचे साहित्य वापरायचे असेल तर त्या लेखकाला त्याचे श्रेय आपल्या प्रबंधात द्यावे. प्रमुख मार्गदर्शक डॉ. युवराज जाधव यांनी आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एकत्र आलो आहोत, तो विषय म्हणजे

कॉपीराईट आणि वाड्मयचौर्य. ज्ञान, माहिती आणि सर्जनशीलतेच्या या युगात प्रत्येक व्यक्ती काही ना काही निर्मिती करत आहे. लेखन, चित्रकला, संगीत, संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये बौद्धिक संपदा निर्माण होत आहे. कॉपीराईट हा त्या निर्मितीला कायदेशीर संरक्षण देतो. तो लेखक, कलाकार आणि संशोधक यांच्या हक्कांचे रक्षण करतो. दुसरीकडे, वाड्मयचौर्य म्हणजे दुसऱ्याच्या कामाचा अनधिकृत वापर करून ते स्वतःचे म्हणून सादर करणे. ही केवळ नैतिक चूक नाही, तर अनेक वेळा कायदेशीर गुन्हा ठरतो. आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध आहे. त्यामुळे कॉपी-पेस्ट करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पण योग्य संदर्भ देणे, मूळ लेखकाचा सन्मान राखणे आणि

प्रामाणिकपणा जपणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. या सेमिनारमधून आपण कॉपीराईटचे मूलभूत तत्त्व वाड्मयचौर्यचे प्रकार, त्याचे परिणाम आणि त्यापासून कसे दूर राहावे हे समजून घेणार आहोत. या विषयाची सखोल माहिती घेऊन आपल्या ज्ञानाचा योग्य आणि प्रामाणिक वापर करण्याची सुरुवात करूया असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. सुनील भोसले यांनी केले सूत्रसंचालन डॉ संजय सुरेवाड वक्त्यांचा परिचय प्रा-महेश गोरे तर आभार प्रदर्शन डॉ-भारत पल्लेवाड व तांत्रिक सहाय्य अली शेख व विजय काकुळते यांनी केले. तर या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, पी. के. जाधव व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande