महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील ७० किलो वजन गटात सुमितकुमार भारस्करने पटकावले सुवर्णपदक
बीड, 08 एप्रिल (हिं.स.)। शेलापुरी येथील सुमितकुमार ऊसतोड कामगाराचा मुलगा पहिलवान आप्पासाहेब भारस्कर याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ७० किलो वजन गटातील गादी विभागात सुवर्णपदक पटकावले आहे. पुण्याच्या वाघोली येथे महाराष्ट्र केसरी अधिवेशन पार पडले अस
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील ७० किलो वजन गटात सुमितकुमार भारस्करने पटकावले सुवर्णपदक


बीड, 08 एप्रिल (हिं.स.)।

शेलापुरी येथील

सुमितकुमार ऊसतोड कामगाराचा मुलगा पहिलवान आप्पासाहेब भारस्कर याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ७० किलो वजन गटातील गादी विभागात सुवर्णपदक पटकावले आहे. पुण्याच्या वाघोली येथे महाराष्ट्र केसरी अधिवेशन पार पडले असून, यावेळी पहिलवान सुमितकुमार भारस्कर अशा मोठ्या गुण फरकाने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये पुणे शहरचा विपुल थोरात सोबत ०८-०५ अशी लढत करून अंतिम फेरीत पोहचला.

अंतिम फेरीत कोल्हापूर शहरातील सत्तपा हिरगुडे सोबत सुमितकुमारने ०६-०० अशा मोठ्या गुण फरकाने विजय मिळवून सुवर्णपदक पटकावला आहे.

पहिलवान सुमितकुमार भारस्कर हा पुण्यातील मारुंजी येथे अमोल बुचडे कुस्ती अकादमीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande