द ब्राइट स्टार इंग्लिश स्कूलची मुंबईत सुवर्ण झेप
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)। ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत, गुणवत्तेच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ''द ब्राइट स्टार इंग्लिश स्कूल, उमरदरी'' ने पुन्हा एकदा यशाचा नवा शिखर गाठले आहे. मुंबई येथे संपन्न झालेल्या प्रतिष्ठेच
द ब्राइट स्टार इंग्लिश स्कूलची मुंबईत सुवर्ण झेप


नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)।

ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप

प्रज्वलित करत, गुणवत्तेच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या 'द ब्राइट स्टार इंग्लिश स्कूल, उमरदरी' ने पुन्हा एकदा यशाचा नवा शिखर गाठले आहे. मुंबई येथे संपन्न झालेल्या प्रतिष्ठेच्या 'डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान आणि ऐतिहासिक यश संपादन करून संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.

शाळेची होतकरू विद्यार्थिनी प्रगती बालाजी पाटील (इयत्ता ९ वी) हिने सुवर्ण पदक पटकावून यशाची सुवर्ण नोंद केली, तर बद्धिमत्तेची झळाळी दाखवत स्वराज्य वडजे याने कांस्य पदक प्राप्त केले. या दुहेरी यशामुळे शाळेच्या यशमालिकेत आणखी एक मानाचा दागिना जुळला आहे.

केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास साधण्यावर 'द ब्राइट स्टार' मध्ये विशेष भर दिला जातो. नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल आणि होमी भाभा यांसारख्या आव्हानात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना योजनाबद्ध व सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. विशेषतः विज्ञान विषय प्रयोगाधारित पद्धतीने शिकवण्याची अभिनव पद्धत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना मिळाली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande