
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित पश्चिम विभागीय खो-खो (मुले) स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर, यजमान विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई विद्यापीठाने चौथा क्रमांक मिळविला. एकूण ५८ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
समारोप सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, विभागीय सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, एआययूचे स्पर्धा निरीक्षक डॉ. जगदीश गस्थी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नारायण चौधरी, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, अधीसभा सदस्य युवराज पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, स्पर्धा समन्वयक डॉ. पवन पाटील, तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्या, उपविजेत्या तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक मिळवलेल्या संघांना ट्रॉफी आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अधिसभा सदस्य डॉ. महेश बेंबडे, डॉ. महेश वाखरडकर, डॉ. माधव कदम, डॉ. अशोक चाटसे, डॉ. शिवानंद पाटील, डॉ. गणेश मनगिरे, तसेच क्रीडा विभागातील संजयसिंह ठाकुर, रामा किरकन, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, रतनसिंग पुजारी यांनी अथक परिश्रम घेतले. पंचप्रमुख प्रशांत पाटणकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक संदीप तावडे, संतोष सावंत, प्रभाकर काळे, दीपक सपकाळ, रणजीत जाधव, अंकुश चव्हाण, सचिन तहानिक, अमोल मुरकुळे, सुजित माळी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. भीमा केंगले यांनी केले.-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis