बीड - शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। शेतकरी संघटनेच्या वतीने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता. माजलगांव येथे केले आहे. १०० महिला आणि पुरुष शिबिरार्थीच्या मुक्कामाची व्यवस्था खेरडा खुर्द येथे करण्यात आली आहे.
बीड - शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। शेतकरी संघटनेच्या वतीने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता. माजलगांव येथे केले आहे. १०० महिला आणि पुरुष शिबिरार्थीच्या मुक्कामाची व्यवस्था खेरडा खुर्द येथे करण्यात आली आहे. मुक्कामी राहणाऱ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन शेतकरी संघटनेचे माजलगाव तालुका अध्यक्ष सतीश पाटील रिंगणे तसेच शिबीराचे आयोजक महादेव गायकवाड, आण्णासाहेब मस्के यांनी केले आहे.

दि.१६ एप्रिल रोजी सर्जक स्वातंत्र्य संघटनेचे प्रमुख अमर हबीब शिबिराचे उद्घाटन करून मार्गदर्शन करतील. दुपारच्या जेवणानंतर शेतीमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा? यासंबंधी माजलगावचे तालुका कृषी अधिकारी गणेश दाभाडे आणि गौरव बापमारे हे माहिती देतील. शेतीमालाचा रास्त भाव की हमीभाव ? यासंबंधी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट माहिती देतील आणि शेतकरी संघटनेच्या क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखिले शेतमजुरांच्या समस्येवर आपले मनोगत व्यक्त करतील. वक्तयाचे भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तरे होतील. रात्रीच्या जेवणानंतर माजलगाव तालुक्यातील कवींचे शेतकरी कवी संमेलन होणार आहे. दि.१७ एप्रिल रोजी शेती अभ्यासक इरफान शेख 'अॅग्रो प्रोडयूसर कंपन्यांची बाजार

व्यवस्था' यावर आपले विचार मांडतील. कृषी मुल्य आयोगाचे माजी सदस्य अच्युत बापू गंगणे 'आम्हीच खरे उद्योजक' याबाबत भुमिका मांडणार आहेत. 'शेतकरी आंदोलनासमोरिल आव्हाने' यावर शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण वडले आपले मनोगत मांडतील. दुपारच्या जेवणानंतर 'रावण राजा राक्षसांचा' या पुस्तकाचे लेखक, बीड जिल्ह्याचे भूषण शरद तांदळे हे बळीराजा कोण होता? याची ऐतिहासिक संदर्भासह माहिती देतील. रात्रीच्या जेवणानंतर अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर यांचा अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम होणार आहे. तर १८ एप्रिल रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील वकील तथा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे शेतकरी विरोधी कायदे याविषयीची माहिती देतील. तसेच २०१७ च्या शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील सरकारच्या भुमिकेचे सविस्तर विवेचन करतील. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा ऊस दर आंदोलनाचे सेनापती रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होणार आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन माजलगाव तालुका जि. बीड शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande