अक्कलकोट : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले स्वामी मंदिरात जाऊन दर्शन
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराची नुकतीच भेट दिली. जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले आण
fg


सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराची नुकतीच भेट दिली. जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मिळवले.

या प्रसंगी त्यांनी देवस्थान समितीच्या सेवाकार्याचे कौतुक केले. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला.

महेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास आणि ऐतिहासिक पारंपारिक पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या भेटीदरम्यान देवस्थान समितीच्या भक्ती, सेवा आणि विविध उपक्रम पाहून मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि स्वतःला धन्य असल्याचे सांगितले.

----------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande