मलकापूर उड्डाणपुलाच्या उर्वरीत कामासाठी ३५ कोटी रुपयाचा निधी मंजूर
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)। उदगीर शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची समस्या सोडवण्याकरीता माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नामुळे उदगीर तालुक्यातील अहमदपूर-शिरूर ताजबंद-उदगीर रा.मा. २४९ उदगीर वळणरस्त्यावर साखळी क्र.१/२०० मध्ये मलकापुर
संजय बनसोडे


लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)।

उदगीर शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची समस्या सोडवण्याकरीता माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नामुळे उदगीर तालुक्यातील अहमदपूर-शिरूर ताजबंद-उदगीर रा.मा. २४९ उदगीर वळणरस्त्यावर साखळी क्र.१/२०० मध्ये मलकापुर गावाजवळ ३५ कोटी रुपयाचा उड्डान पुल आ.संजय बनसोडे यांनी मंजूर केला होता. त्या पुलाचे उर्वरीत काम करण्यासाठी आणखी ३५ कोटी रुपयाचा वाढीव निधी च्या बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली आहे.

उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने व या शहराची बाजारपेठ मोठी आहे. शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी व दवाखान्यासाठी लाखो नागरीक या शहरात ये - जा करत असतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेवुन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहराला लागत असलेल्या मलकापूर गावाजवळ तब्बल सत्तर कोटी सत्तावन्न लक्ष चव्वेचाळीस हजार पाचशे चोवीस रुपये इतक्या रकमेच्या पुल मंजुर करुन घेतला होता. त्याच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यापैकी अगोदर पहिल्या टप्प्यात ३५ कोटी रुपयाचे काम जवळपास झाले असून उर्वरित कामासाठी आणखीन वाढीव ३५ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या बांधकाम विभागाने मंजूर केला आहे. या उड्डानपुलामुळे उदगीर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून येत्या काही महिन्यात या उड्डान पुलावरून वाहतूक चालू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

सदर उड्डानपुलाला निधी मंजूर केल्याबद्दल आ.संजय बनसोडे यांचे मतदार संघातील जनतेने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande