
नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.)।
: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे हर्निया या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 'कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ' या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
या उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ जीआय सर्जन डॉ. संदीप सबनीस करत असून त्यांच्या टीममध्ये डॉ. प्रखर गुप्ता, डॉ. उर्विक पाटील तसेच संपूर्ण जीआय सर्जरी विभागाचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे हर्नियाचे लवकर निदान, आधुनिक उपचारपद्धती आणि सुरक्षित शस्त्रक्रिया याबाबत रुग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हर्निया हा पोटाच्या स्नायूंमध्ये निर्माण झालेल्या कमकुवत भागामुळे होणारा आजार असून वेळेवर उपचार न केल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर या विशेष महिन्यात रुग्णांना तज्ज्ञ सल्ला, आवश्यक तपासण्या आणि अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या पॅकेजअंतर्गत तज्ज्ञ सल्लामसलत व युएसजी तपासणी अवघ्या ₹ ४९९ मध्ये उपलब्ध असून हर्नियाचे लवकर निदान सुलभहोणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV