बीड - अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचेही आयोजन
बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने दि.५ ते १४ एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच मह
बीड - अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचेही आयोजन


बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने दि.५ ते १४ एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी हा आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.

आजच्या २१व्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना समाजातील नैतिकता, आचार-विचार आणि संत परंपरेतील बंधुभाव कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढती अस्थिरता आणि मानसिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक विचारांची गरज अधिक भासू लागली आहे. याच उद्देशाने समाजात अध्यात्मिक ज्ञानाची बीजे रुजवण्यासाठी सुगाव ग्रामस्थांनी हा सप्ताह सोहळा आयोजित केला आहे. सप्ताह कालावधीत दररोज पहाटे ३ ते ६ या वेळेत काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, २ ते ५ श्रीराम कथा, ५ ते ७ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ भोजन, ९ ते ११ हरिकीर्तन, तर रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत संगीत भजन व हरिजागर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज बादाडे, ह.भ.प. रुपाली सवणे परतूरकर, पांडुरंग महाराज कोकाटे (नांदगाव), ह.भ.प. अमित महाराज शास्त्री (खरोळापूर), ह.भ.प. गणेश महाराज सोनवणे (निरपणा), महंत भगवान महाराज वरपगावकर तसेच ह.भ.प. जगन्नाथ महाराज पंढरपूरकर यांची कीर्तन सेवा लाभणार आहे. सोहळ्याची सांगता मंगळवार, १४ एप्रिल रोजी ह.भ.प. हरि महाराज अजनसोंडा यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महापंगतीने होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन सुगाव ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande