सिल्लोड डेपो मॅनेजरसह तिघांवर अॅट्रॉसिटी दाखल
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शरद विठ्ठल भिवसने (वय ४०, रा. वैशालीनगर, सिल्लोड) असे म
सिल्लोड डेपो मॅनेजरसह तिघांवर अॅट्रॉसिटी दाखल


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।

राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शरद विठ्ठल भिवसने (वय ४०, रा. वैशालीनगर, सिल्लोड) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात डेपो मॅनेजरसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत शरद भिवसने यांचे नातेवाईक पोपट भिवसने यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर , वाहतूक निरीक्षक आणि लिपिक हे शरद भिवसने यांना सतत मानसिक त्रास देत होते. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून वारंवार बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. याच छळाला कंटाळून शरद भिवसने यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande