
पुणे, 09 एप्रिल, (हिं.स.)। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान कॉंग्रेसने सुनेत्रा पवाराविरोधात उमेदवार दिल्याने राज्यभर चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन माघार घेण्याची विनंती केली आहे. अशातच आता शरद पवार यांनीही बारामतीची निवडणूक कॉंग्रेसने बिनविरोध करावी असा सल्ला दिला आहे. यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त जागेवर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न आहेत. मात्र कॉंग्रेसने उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धुसर झाली .सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दोन वेळा फोन केला. यानंतर गुरुवारी सकाळी आमदार रोहित पवार यांनी देखील सपकाळ यांची भेट घेतली, यानंतर शरद पवार यांनी देखील बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी कॉंग्रेसला सल्ला दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु