नांदेड - फुलवळ येथे छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। कंधार महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय कंधारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महसूल विभागाच्य
नांदेड - फुलवळ येथे छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान


नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। कंधार महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय कंधारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या विविध योजना व सेवा नागरिकांना एका उत्राखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अभियानाअंतर्गत कंधार तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 10 एप्रिल 2026 रोजी फुलवळ मंडळात होणार आहे. सदर शिबिर सिध्दिविनायक लॉन्स अँन्ड मंडप डेकोरेटर, मेन रोड फुलवळ येथे आयोजित करण्यात आले असून फुसवळ मंडळातील सर्व सज्जाअंतर्गत गावांतील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभघ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या शिबिरात नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभमिळणार आहे. त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली, 7/12 उता-यातील चुकांची दुरुस्ती, डीजीटल स्वाक्षरीसह 7/12 उतारा, अ उता यांचे वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलोअर प्रमाण, अकृषीक परवानगी व मार्गदर्शन, हसनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय योजनांचे लाभ मंजूर, विद्यार्थी आवश्यक दाखले, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणे, घरांसाठी पट्टे वाटप यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिरांचे आयोजन राहूल कर्डिले, दोनुर अन्यना रेड्डी, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील फुलवळ मंडळातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपरोक्त दिवशी संबंधित मंडळात उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभघ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande