लातूर - शेतातील वादातून प्राणघातक हल्ला; एक गंभीर जखमी
लातूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। देवणी तालुक्यातील हंचनाळ शेतशिवारात शेताच्या कब्जाच्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली . या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दहा आरोपींवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्य
शेतीचा वाद


लातूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। देवणी तालुक्यातील हंचनाळ शेतशिवारात शेताच्या कब्जाच्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली . या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दहा आरोपींवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बालाजी हनमंतराव शेटकार (४६) हे आपल्या पत्नीसमवेत शेतात गेले असता आरोपींनी एकत्र येत त्यांच्यावर काठी व धारदार हत्यारांनी हल्ला केला. आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत काठीने डाव्या खांद्यावर वार करून गंभीर दुखापत केली. तर आरोपी क्रमांक ५ यांनी हातातील चाकूने पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र वार चुकल्याने तो फिर्यादीच्या डोक्यावर बसून ते गंभीर जखमी झाले. आरोपी क्रमांक ४ याने फिर्यादीला धरून ठेवले, तर इतर आरोपींनी धक्काबुक्की करत शेताबाहेर जाण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

शेतावर बळजबरीने कब्जा करण्याच्या उद्देशाने आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. आरोपींमध्ये मास शेल्हाळकर (रा. उदगीर), शिवा कांबळे, सत्यम कांबळे, सौद उटवाले, एजाज उर्फ नूर सय्यद, तसेच सत्यभामा कळसे, त्रुषिकेश कळसे, आदिती राजकुमार कळसे (रा. हंचनाळ) यांचा समावेश असून अजून दोन आरोपी अनोळखी आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून गूरंन ८२/२०२६ कलम १०९, १८९(२)१८९ (४), १९०, १९१(२) १९१ (३) ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२, तसेच कलम १३५ मुपोका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी आरोपींनी तीन कार व मोटारसायकलचा वापर केल्याची नोंद आहे.

अधिक तपास पोउपनि गोपाळ वऱ्हाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सपोनि गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande