
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। खुलताबाद तालुक्यातील पंचायत समिती १५ व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत स्तरावर ३ कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून, प्रत्येक सदस्याला आपल्या विकासकामे गणात करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये मिळणार आहेत. या निधीमुळे ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळणार आहे.
खुलताबाद पंचायत समितीची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. तालुक्यातील एकूण ६ सदस्यांना या निधीचा लाभ होणार असून, प्रत्येकी ५० लाखांच्या नियोजनाने तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार आहे.
या मिळालेल्या निधीतून प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी आणि सार्वजनिक सोयीसुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत. पंचायत समिती स्तरावरून या निधीचे वाटप करण्यात येणार असून, मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यावर सदस्यांचा भर असणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis