नांदेड विभागात डिजिटल अवेअरनेस डेचे आयोजन
नांदेड, 09 एप्रिल, (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विविध स्थानकांवर डिजिटल अवेअरनेस डे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणे आणि प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांचे फायदे याबाबत जनजागृती करणे
नांदेड विभागात डिजिटल अवेअरनेस डेचे आयोजन


नांदेड, 09 एप्रिल, (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विविध स्थानकांवर डिजिटल अवेअरनेस डे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणे आणि प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांचे फायदे याबाबत जनजागृती करणे हा होता.

या अंतर्गत नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम, आदिलाबाद तसेच इतर स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रवाशांशी संवाद साधून डिजिटल पेमेंटचे फायदे, सोय आणि सुरक्षितता यांची माहिती दिली.

आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालय, आदिलाबाद येथील विद्यार्थ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांसह उत्साहाने सहभाग नोंदवून रेल्वे सेवांसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्याचा संदेश दिला. हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान प्रवाशांना तिकीट खरेदी व इतर रेल्वे सेवांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

हेल्प डेस्क उभारण्यात आले. येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तिकीट बुकिंग व इतर देयके कशी करावीत याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान ५०० हून अधिक प्रवाशांना डिजिटल पेमेंटचे फायदे आणि रेल्वे सेवांसाठी उपलब्ध विविध डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती देण्यात आली. यामध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि स्थानकांवरील डिजिटल पेमेंट पर्यायांचा समावेश आहे. या उपक्रमाचा उद्देश जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवहारांसाठी प्रवाशांना डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे असून, भारत सरकारच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला चालना देणे हा आहे.

दक्षिण मध्य रेल्वे अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबवून डिजिटल सेवांचा प्रसार व प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande