निमा सोमवारी करणार डाॅक्टरांचा विविध पुरस्कारांनी सन्मान
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या संघटनेचा 78 वा स्थापना दिवस दिनांक 13 एप्रिल रोजी असून यंदा निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार
rge


सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)।

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या संघटनेचा 78 वा स्थापना दिवस दिनांक 13 एप्रिल रोजी असून यंदा निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण यासोबत वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा निमाकडून विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती निमा पदाधिकारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. सोलापुरातील इंटिग्रेटेड डॉक्टरांच्या हक्कासंबधी व प्रश्नांबाबत निमा सोलापूर शाखेकडून विविध स्तरावरून प्रयत्न केले जात असतात. त्याचसोबत इतर सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम व प्रबोधनपर व्याख्याने ही आयोजित केली जातात. यामुळे निमा सोलापूर शाखेला नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेस्ट ब्रांच अवॉर्ड सह विविध पारितोषके देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निमा स्थापना दिनाच्या औचित्यावर रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर सायंकाळी 6 वाजता वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवर डॉक्टराना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे महापौर श्री विनायक कोंड्याल आणि प्रसिद्ध उद्योजिका डॉ. सुहासिनी यतिन शहा या उपस्थित राहणार आहेत. दिनांक 13 एप्रिल रोजी उळे तालुका दक्षिण सोलापूर येथे आरोग्य मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच विडी घरकुल परिसरातील गरजू रुग्णांसाठी डॉ. जिड्डीमनी यांच्या कमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन निमा सोलापूचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande