छ. संभाजीनगर - सोयगाव तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील ज्या ४२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तहसील प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसू
छ. संभाजीनगर - सोयगाव तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील ज्या ४२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तहसील प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर कोणालाही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्यांनी १३ एप्रिल २०२६ पर्यंत तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात. प्राप्त झालेल्या हरकतींवर अधिकाऱ्यांमार्फत

उपविभागीय सुनावणी घेतली जाणार असून सदरील आक्षेप व हरकती २३ एप्रिलपर्यंत निकाली काढल्या जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनानुसार, २८ एप्रिल रोजी प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रशासकीय हालचालींमुळे आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून प्रभाग रचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande